मुंबई : तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी पोस्ट ऑफिस हे एक उत्तम ऑप्शन आहे. तसे तर,  पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या स्मॉल सेविंग स्किम आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉजिट स्किमबद्दल माहिती देणार आहोत. जेथे तुम्हाला SBI पेक्षाही अधिक व्याज मिळू शकते. या योजनेत तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षासाठी पैसे जमा करू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6.7 टक्के व्याज
SBI मध्ये सध्या 5 वर्षाच्या फिक्स्ड डिपॉजिटवर (Fixed Deposit) 5.30 टक्के वार्षिक व्याज मिळते. तर पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉजिट स्किमवर ( Time Deposit Scheme) 5 वर्षाच्या जमावर 6.7 टक्के वार्षिक व्याज मिळतो.  जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल. तर 1-3 वर्षाची TD केली, तर तुम्हाला 5.50 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय 5 वर्षाच्या डिपॉजिटवर 6.7 टक्के व्याज मिळेल.


किती दिवसात रक्कम दुप्पट होणार
जर तुम्ही टाइम डिपॉजिट स्किममध्ये पैसे गुंतवले तर, तुम्हाला 6.7 टक्क्यांच्या दराने व्याज मिळेल.  म्हणजेच तुमचे पैसे दुप्पट होण्याला साधारण 10.74 वर्ष म्हणजेच 129 महिने लागतील. 


जमा - 5 लाख
व्याज दर - 6.7 टक्के वार्षिक
मॅच्युरिटी पिरिअड - 5 वर्षे
मॅच्युरिटीवर रक्कम 691500
व्याजाचा फायदा 191500


करामध्ये सूट
टाइम डिपॉजिट स्किमध्ये पैसे गुंतवल्यास इनकम टॅक्स ऍक्ट 1961 च्या सेक्शन 80 सी अंतर्गत टॅक्समध्ये सूटचा फायदा मिळतो. खाते उघडताना नॉमिनेशनची सुविधा आहे.