नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी आज पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ अमेठीत जात आहेत. इथे लावण्यात आलेल्या एका पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींच्या या अमेठी दौ-याच्या पार्श्वभूमीवर एक वादग्रस्त पोस्टर अमेठीतल्या गौरीगंज रेल्वे स्टेशनजवळ लावण्यात आलंय. त्यामध्ये राहुल गांधींना रामाचा अवतार तर मोदींना रावणाचा अवतार दाखवण्यात आलाय. राहुलच्या रुपात 2019 मध्ये रामराज्य येईल, असं पोस्टरमध्ये म्हणण्यात आलंय.



राहुल गांधी अमेठीत दोन दिवसांच्या दौ-यावर आहेत. यात ते पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणार आहेत. सात ठिकाणी ते रोड शो करणार आहेत. 



दुस-या एका पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना श्रीकृष्णाच्या अवतारात दाखवण्यात आलं आहे. सध्या कॉंग्रेसची ही पोस्टरबाजी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.