नवी दिल्ली : एक मुलगा रस्त्यावरून जीवतोडून पळतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होती. आईचं आजारपण आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी या मुलाची धडपड चालू होती. त्याची ही धडपड सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आली आणि त्याला मदतीचा हात मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भररस्त्यात रात्री उशिरा धावणाऱ्या या मुलाचं नाव प्रदीप मेहरा आहे. नोएडामध्ये रस्त्यावर धावणारा प्रदीप मेहराला आर्थिक मदत मिळाली. रिटेल ब्रॅण्ड शॉपर्स स्टॉपने त्याला आर्थिक मदत केली. आईच्या आजारावर उपचार करण्यासाठी आणि त्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एका ब्रॅण्डने 2.5 लाख रुपयांचा चेक दिला. 


प्रदीपची आईला टीबीचा आजार आहे. या आजाराचे उपचार सध्या तिच्यावर सुरू आहेत. शॉपर्ट स्टॉपने प्रदीपला चेक देऊन आर्थिक पाठबळ दिलं. त्याच्या आईच्या उपचार करण्यासाठी आर्थिक मदत केली. 


प्रदीप रात्री उशिरा आपल्या पाठीवर बॅग घेऊन धावात होता. त्याला लिफ्टसाठी विचारण्यात आलं तेव्हा त्याने नकार दिला. तो असा का पळतोय विचारलं तेव्हा त्याने याबाबत माहिती दिली. 


प्रदीप म्हणाला की मी रोज 10 किमी रात्री धावतो. मला सैन्यदलात भरती व्हायचं आहे. माझं ते स्वप्न आहे आणि त्याची तयारी मी करतोय. मला सकाळी जेवण करायचं आणि कामावरही जायचं आहे. 


प्रदीपची आई अल्मोडा रुग्णालयात सध्या उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. नोएडा इथे तो आपल्या मोठ्या भावासोबत राहातो. प्रदीपला एका ब्रॅण्डने मदतीचा हात दिला आहे. प्रदीपची आई लवकर बरी व्हावी यासाठी सोशल मीडियावरही अनेक जण प्रार्थना करत आहेत.