मुंबई : काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर व्हायरल झालेल्या 'त्या' मुलाच्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली. आर्मीमध्ये भर्ती होण्याच्या उद्देशाने प्रदीप मेहरा रोज आपल्या ऑफिसमधून घरापर्यंत धावत जात असे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रदीप मेहरासाठी एक चांगली बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रदीपला सतत मदत मिळत आहे. या व्हिडीओमध्ये लष्कर भरतीच्या तयारीसाठी मध्यरात्री शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या प्रदीप मेहराला एका रिटेल कंपनीने अडीच लाख रुपयांची मदत दिली आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याच्या सेक्टर-49 बरोला येथील निवासस्थानी प्रवेश धनादेश सुपूर्द केला.


उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी प्रदीप मेहरा नोएडा सेक्टर-४९ बरोला येथे राहतो. सेक्टर-16 मध्ये काम करत असताना प्रदीप दररोज रात्री 11 वाजता काम संपवून 10 किमीचा प्रवास धावत करत असे. दररोज कामामुळे सैन्याच्या भर्तीची तयारी करता येत नसे. त्यामुळे मध्यरात्री शहरातील रस्त्यावर धावत तो आपलं घर गाठत असे.  त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.


 


आईच्या उपचारावरील खर्चामुळे कुटुंबावरील कर्ज वाढतच होते. अशा परिस्थितीत त्याला बारावीनंतर नोकरी करावी लागली, पण त्याने हार न मानता आपल्या सैन्याची तयारी सुरूच ठेवली. आता लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.


दिग्दर्शक विनोद कापरी यांनी मध्यरात्री नोएडा शहरातील रस्त्यावर धावत असलेल्या प्रदीप मेहराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांच्या संघर्षाची कहाणी समोर आली. यानंतर 21 मार्च रोजी अकादमीने त्याला मोफत प्रशिक्षण देऊ केले होते, ज्यासाठी त्याने आता होकार दिला आहे. प्रदीपच्या म्हणण्यानुसार, आईच्या उपचारावरील खर्चामुळे त्याच्या कुटुंबावरील कर्ज वाढत होते.


अशा परिस्थितीत त्याला बारावीनंतर नोकरी करावी लागली, पण त्याने हार न मानता आपल्या सैन्याची तयारी सुरूच ठेवली. वास्तविक, त्याच्या धावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्याला इंटरनेटवर चांगलील पसंती मिळाली.