प्रदीपच्या मेहनतीचे फळ, वडील करतात पेट्रोल पंपावर काम
आएएस, आयपीएस, आयएफएस यांसारख्या पदांसाठी एकुण ७५९ विद्यार्थांच्या नावांची घोषणा केली आहे.
शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी २०१८ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत दिल्लीत राहणाऱ्या प्रदीप सिंहने ९३ गुण मिळवत बाजी मारली. आपल्या गरिबीवर मात मिळवत त्याने मानाचा तुरा खोवला आहे. जवळून गरिबी अनुभवलेल्या प्रदीपच्या आई-वडीलांनी त्याच्या उज्वल भविष्यासाठी राहते घर विकले. काबाड कष्ट करून ते भाड्याच्या घरात राहत आहेत. त्याचे वडील मनोज सिंह पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करत आहेत. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार प्रदीपकडे दिल्लीत येऊन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. पण अशा परिस्थितीत त्याने फक्त त्याच्या आत्मविश्वसाच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
प्रदीपने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा काळात त्याची आई आजारी पडली होती. आईच्या आजारपणाची बातमी प्रदीपला सांगितल्यास त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होईल. या भितीने त्याच्या वडीलांनी त्याच्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली. तेव्हा प्रदीप बी.कॉमच्या परीक्षेची तयार करत होता. आई-वडीलाचे कष्ट आणि प्रदीपची मेहनतीने त्याच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुढे जाऊन प्रदीपला वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.
आएएस, आयपीएस, आयएफएस यांसारख्या पदांसाठी एकुण ७५९ विद्यार्थांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये मूळ इंदोरमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय प्रदीपचे सुध्दा नाव आहे. प्रदीप २०१७ पासून दिल्लीत स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहे.