मुंबई :  पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्त्वाची बातमी आहे. लाभदारक शेतकऱ्यांना लवकर इ-केवायसी (E Kyc) पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शक्य तितक्या लवकर इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याचं आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आलं आहे. इ केवायसी कशी पूर्ण करायची, हे आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात. (pradhan mantri kisan samman nidhi yojana know how to complete e kyc step by step)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इ-केवायसीसाठी 2 पर्याय 


इ केवायसी या प्रक्रियेच्या माध्यमातून खातेधारकाची ओळखीची पुष्टी केली जाते. योजनेचा लाभ घेणारा आणि जे कागदपत्र जमा केलेले आहेत, ती व्यक्ती तीच आहे ना, याची इ-केवायसीद्वारे खातरजमा केली जाते. 


Pmkisan.gov.in या वेबसाईटवर लॉगीन करा.  


वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला लाल अक्षरात भलं मोठं वाक्य दिसेल. इंग्रजीत हे वाक्य असेल. या मेसेजद्वारे लाभधारकांना इ-केवायसी करणं बंधनरकारक असल्याचं म्हंटलं आहे.  तसेच इ-केवायसी करण्याचे 2 मार्गही सांगण्यात आले आहेत. 


मोबाईल-आधार लिंक आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अशा 2 पद्धतीन तुम्ही इ-केवायसी पूर्ण करु शकता. 


तुमचा मोबाईल नंबर आधारसह लिंक असेल, तर तुमचं काम सोपं होईल.


मोबाईल नंबरसह आधार लिंक असल्यास, Aadhaar Based Otp Authentication च्या माध्यमातून लाभदराकांना इ-केवायसी पूर्ण करता येईल. यासाठी वेबसाईटवर फॉर्मर कॉर्नमध्ये E-kyc या मेन्यूवर क्लिक करा. ही झाली एक पद्धत. 


दुसरी पद्धत अशी की, बायमेट्रिक प्रामाणिकरण (Biomatric Authentication) या पद्धतीनेही इ-केवायसी अपडेट करता येईल. मात्र यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन हे काम करुन घ्याव लागेल.      


आधारद्वारे इ-केवायसी कसं करायचं?


Pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर Farmer Corner या मेन्यूवर E-kyc असा पर्याय दिसेल. 


E-kyc या टॅबवर क्लिक केल्यास Aadhar E-Kyc असं पेज दिसेल.  


या नव्याने ओपन झालेल्या पेजमध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. आधार नंबर टाकल्यावर सर्च या पर्यायावर क्लिक करावं लागेल. 


नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्ही टाकलेला आधार क्रमांक दिसेल. यानंतर आता तुम्हाला आधारसह लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. विशेष बाब म्हणजे आधारसह लिंक असेल, तरच तुम्हाला या पद्धतीने ही प्रक्रिया करता येईल.  


आधारसह लिंक असलेला मोबाईल टाकल्यावर जनरेट ओटीपीवर क्लिक करा. तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी तुम्हाला भरावा लागेल.   


ओटीपी टाकल्यानंतर सबमिट फॉर ऑथिंटिकेशन या टॅबवर क्लिक करा. तुम्हाला इ-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल. अभिनंदन तुमची इ-केवायसी पूर्ण झालेली आहे. 


ही बाब लक्षात ठेवा


केंद्र सरकारने या विशेष सेवेला आत्ताच सुरुवात केली आहे. केवायसी बंधनकारक असल्याने अनेक जण एकाचवेळी ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतात. 


त्यामुळे अनेकदा तुम्हाला ही सर्व प्रक्रिया करताना रेकॉर्ड नॉट फाऊंड किंवा तुम्ही टाकलेल्या ओटीपीवर Invalid otp असं दिसेल. तुमच्यासोबत असं काही झाल्यास काही दिवसांनी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन हे काम पूर्ण करुन घ्यावं लागेल.  


योजनेअंतर्गंत किती रक्कम मिळते?


या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये मिळतात. ही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना काही टप्प्यांमध्ये मिळते. 


दर 4 महिन्यांनी एकदा 2 हजार, अशा पद्धतीने वर्षात 3 हफ्त्यात 6 हजार रुपये मिळतील.