नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात दोन चांगल्या बातम्या आहेत. या योजनेसंदर्भातील पुढचा २ हजारांचा हफ्ता डिसेंबरमध्ये येऊ शकतो. तर दुसरी बातमी अशी की, कागदपत्रांअभावी किंवा कोणत्या चुकीमुळे नोंदणी झाली नसेल आणि मागचा हफ्ता तुम्हाला मिळाला नसेल तर कागदपत्रांमधील चूक तुम्ही सुधारु शकता आणि पुन्हा अर्ज करु शकता.


डिसेंबरमध्ये पुढचा हफ्ता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हफ्ते दिले जातात. दोन-दोन हजारांचे तीन हफ्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे ६ हफ्ते देण्यात आले आहेत. सातवा हफ्ता डिसेंबरमध्ये दिला जाऊ शकतो.



चूक सुधारण्याची संधी 


मागचा हफ्त्यातील पैसे मिळाले नसलेल्यांना चुका सुधारण्याची संधी आहे. यासाठी पंतप्रधान शेतकरी योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल. शेतकरी घरबसल्या अर्ज करुन पेपर्स ऑनलाईन अपलोड करु शकतात. ही प्रक्रीया खूप सोपी आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे. 



१) पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची वेबसाईट pmkisan.gov.in वर जा


२) वेबसाईटच्या उजवीकडे खालच्या बाजूस Farmers Corner असे दिसेल. त्यावर क्लिक करा. 


३) इथे अनेक पर्याय दिसतील. 


४) इथे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करु शकता.


५) आधारवरील नावाची स्पेलिंग, अकाऊंट नंबरमधील चुका सुधारायच्या असल्यास हेल्पडेस्कवर क्लिक करा. 


६) इथल्या अर्जावर क्लिक करु तुम्ही चुका सुधारु शकता. 


७) कोणाला आणखी मदत हवी असल्यास हेल्पलाईन - ०११-२४३००६०६ वर फोन करु शकता. 


चुका सुधारल्यानंतर तुम्हाला या योजनेचे हफ्ते सुरु होतील.