मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीसाठी विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत, तुम्ही 12 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवू शकता. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहे. या योजनेसाठी फक्त 12 रुपयांचा प्रीमियम एका वर्षासाठी असतो.


योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


18 ते 70 वयोगटातील कोणताही बँक खातेदार सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, प्रत्येक वर्षासाठी विमा कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.


दावे 30 दिवसांच्या आत करणे आवश्यक



प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत, अपघात झाल्यास 30 दिवसांच्या आत दावा करावा लागतो. हा दावा कमाल 60 दिवसांत निकाली काढला जातो. या योजनेअंतर्गत विमा घेण्यासाठी, तुमच्या खात्यात 31 मे पर्यंत पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे जेणेकरून ही रक्कम आपोआप कापली जाईल.


2 लाखांचा कव्हर



पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, या योजनेअंतर्गत(Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) नॉमिनीला व्यक्तीला 2 लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे. अपघातात, दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले किंवा एक डोळा निकामी झाला किंवा एक हात किंवा एक पाय निकामा झाला असेल, तर पॉलिसीधारकास 2 लाख रुपये दिले जातात.


अशा प्रकारे मिळतील एक लाख 



जर पॉलिसीधारकाला अपघातात एका डोळ्याची दृष्टी गेली किंवा एक हात किंवा एक पाय अशक्त झाला, तर अशा परिस्थितीत एक लाख रुपये मिळण्याची तरतूद आहे.


या स्थितीत विमा संरक्षण मिळणार नाही



विमा पॉलिसीशी जोडलेल्या बचत खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास किंवा पॉलिसीधारकाने खाते बंद केले असल्यास, विमा संरक्षण उपलब्ध होणार नाही. 
जर विमाधारकाचा विमा एकापेक्षा जास्त बँक खात्यांद्वारे कापला गेला असेल, तर कव्हर फक्त एकाच खात्यावर उपलब्ध असेल.


योजनेसाठी अर्ज



या योजनेसाठी (PMSBY) तुम्ही तुमच्या बँकेमार्फत  अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही सरकारी जनरल विमा कंपन्या किंवा इतर कोणत्याही सामान्य विमा कंपन्यांकडून खरेदी करू शकता.