प्रद्युम्न हत्या प्रकरण : अन आरोपी विद्यार्थ्याची प्रद्युम्नसोबतची ओळख जीवघेणी ठरली !
गुडगाव - प्रद्युम्न मर्डर केसचा उलगडा झाल्यानंतर अनेक पालकांच्या मनात धस्स झाले.
गुडगाव - प्रद्युम्न मर्डर केसचा उलगडा झाल्यानंतर अनेक पालकांच्या मनात धस्स झाले.
रायन इंटरनॅशनल शाळेमध्ये ७ वर्षीय प्रद्युम्नची त्याच शाळेतील ११वीतील एका विद्यार्थ्याने खून केल्याची बाब सीबीआयच्या तपासामध्ये उघड झाली आहे.
आरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न हे दोघे शाळेत पियानोच्या वर्गामध्ये एकत्र होते अशी माहिती त्याने दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी विद्यार्थी प्रद्युम्नला बोलवताना दिसला होता. या 8 सेकंदाच्या फुटेजवरूनच या मर्डर केसचा उलगडा होण्यास चालना मिळाली. तेव्हा याबाबत अधिक कसून चौकशी केल्यानंतर आरोपी विद्यार्थी आणि प्रद्युम्न पियानो क्लासमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षक पालक सभा आणि परीक्षा टाळण्यासाठी आरोपी विद्यार्थ्याला कारण हवे होते. त्यातूनच त्याने हा खून केल्याची माहिती समोर आलीआहे.
शाळेच्या वॉशरूममध्ये चाकू घेऊन पोहचल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याने समोर असलेल्या प्रद्युम्नवर त्याचे वार केले. प्र्द्युम्नच्या स्कुल बॅगचा आधार घेऊन उभा असल्याने रक्ताचे शिंतोडे त्याच्या कपड्यावर उडाले नाही.
आरोपी विद्यार्थ्याने थोड्या वेळात बाहेर येऊन शाळेचा माळी आणि शिक्षकाला प्रद्युम्न रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहितीदेखील दिली.