`या` मुलासोबत प्रणव मुखर्जींनी काढला खास सेल्फी
आजकाल प्रत्येक लहान क्षण आठवणीच्या स्वरूपात कैद करण्यासाठी सेल्फी काढला जातो.
मुंबई : आजकाल प्रत्येक लहान क्षण आठवणीच्या स्वरूपात कैद करण्यासाठी सेल्फी काढला जातो.
या सेल्फीने काहींना आयुष्यभर पुरतील अशा काही गोड आठवणी दिल्या तर सेल्फीचं खूळ काहींच्या जीवावर बेतलं.
भारताचे पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनादेखील 'सेल्फी'चा मोह आवरता आला नाही. प्रणव मुखर्जींनी एक खास फोटो ट्विटरवर अपलोड केला आहे. ट्विटरवर हा फोटो अपलोड केल्यानंतर त्यांनी लिहले आहे की,' लहान मुलांना भेटायला मला नेहमीच आवडतं. या फोटोतील मुलाचं नाव हमजा सैफी आहे. त्यानेच मला सेल्फी काढायचं शिकवलं आहे.'
हमजा सैफी हा मुलगा प्रणव मुखर्जींना भेटायला गेला होता. त्यावेळी त्याने प्रणवदांसोबत सेल्फी क्लिक केला. यावेळी प्रणव मुखर्जींनीही मुलाचा हिरमोड न करता त्याच्या डोक्यावर हात ठेवत सेल्फी क्लिक करून घेतला. प्रणव मुखर्जींनी हा फोटो अपलोड केल्यानंतर या ट्विटला अनेक लाइक्स आणि रिट्विट्स मिळाले. या फोटोचं कौतुक करताना अनेकांनी प्रणव मुखर्जींना शुभेच्छाही दिल्या.