अलाहाबाद : 'टाइम्स ऑफ इंडिया'या दैनिकाने विहिंपच्या मार्गदर्शक मंडळातील एका वरिष्ठ सदस्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडियांना पदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. 


 कार्याध्यक्ष पदावरुन दूर केलं जाण्याची शक्यता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत संमेलनात सहभागी होण्यासाठी अलाहाबादमध्ये उपस्थित असलेल्या अनेक विहिंप नेत्यांनी तोगडियांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत.  पण दुसरीकडे  केंद्र आणि राजस्थान सरकारवर केलेल्या टीकेमुळे प्रवीण तोगडियांना विहिंपच्या कार्याध्यक्ष पदावरुन दूर केलं जाण्याची शक्यता असल्याचे, या वरिष्ठ सदस्याने म्हटलं आहे.


काही दिवसांपूर्वी जवळपास 12 तास बेपत्ता


प्रवीण तोगडिया  हे काही दिवसांपूर्वी जवळपास 12 तास बेपत्ता होते. यानंतर ते अहमदाबादच्या शाही बाग परिसरात बेशुद्धीच्या अवस्थेत सापडले. शुद्धीवर आल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेत, आपला एन्काउंटर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप केला होता.


तोगडियांवर शिस्तभंगाची कारवाई  होणार?


मात्र या घटनेची गांभीर्याने दखल घेत, तोगडियांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे विहिंप नेते स्वामी चिन्मयानंद यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं. विशेष म्हणजे, त्यामुळे त्यांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असंही चिन्मयानंदांनी स्पष्ट केलं आहे.