मुंबई : गेल्या काही दिवसांपासून घरात असणाऱ्या गॅस गिझरमुळे घडलेल्या अपघातांनी महाराष्ट्र हादरला आहे. ही गोष्ट जीवावर बेतू लागली आणि ज्यांच्या घरात गॅस गिझरचा वापर केला जातोय, त्यांच्या मनात वेगळ्याच भीतीनं घर केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात गॅस गिझर वापरत असताना भीती मोठी होऊ न देता सतर्कता राखत काळजी घेतली जाणं महत्त्वाचं असतं. 



अशा वेळी काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या... 
- गॅस गिझरसाठी वापरात येणारा सिलिंडर बाथरुमच्या बाहेर ठेवा. असं केल्यास गॅस बाथरुममध्ये लीक होणार नाही. 
- बाथरुममध्ये एक्झॉस्ट फॅन असणं गरजेचं आहे. 
- वापर झाल्यानंतर सिलिंडरचा रेग्लुलेटर बंद करा. 
- रात्री झोपण्याआधी रेग्युलेटरची कॅप लावा. 
- गॅसचा वास आल्यास काडेपेटी किंवा लाइटर पेटवू नका. 
- गॅस लिकेज असताना पंखे, लाईट सुरु करु नका. 
- गॅसनं पेट घेतल्यास सिलिंडरभोवती ओली चादर गुंडाळा.