Love Affair News: प्रेमात ठार वेडे असलेली लोक कधी काय करतील सांगू शकत नाही. अलीकडेच नात्यांची व्याख्या बदलत चालली आहे. अनैतिक संबंधातून घडलेले गुन्हे किंवा विवाहबाह्य संबंधात झालेली वाढ हे चिंतेचे कारण आहे. उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्भवती महिला (pregnant women) तिच्या प्रियकरासोबत (Boyfriend) पळून गेली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. (Extra Marital Affair News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेश येथील मिर्जामुराद येथील गावात हा प्रकार घडला आहे. विवाहित महिला तिच्या पतीला सोडून प्रियकरासोबत राहायचे आहे. हे प्रकरण पंचायत व समुपदेशकांपर्यंत पोहोचले होते. मात्र, महिला प्रियकरासोबतच राहण्याच्या हट्टावर अडून बसली होती. इतकंच नव्हे तर महिलेने तिचे मंगळसूत्र आणि लग्नात सासरच्यांकडून मिळालेले दागिनेही पतीला परत दिले आहेत. सासरच्या लोकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. घरच्या इज्जतीसाठी आणि पोटातल्या बाळासाठी तरी निर्णय मागे घे असं समजवत राहिले पण तिने कोणाचेच काही ऐकले नाही. ही घटना बुधवारी घडली आहे. 


दीड वर्षांपूर्वी झाले होते लग्न


महिलेच्या दीड वर्षांपूर्वी अदमापूर गावातील रहिवाशी असलेल्या तरुणासोबत लग्न झाले होते. मात्र, महिला तिच्याच शेजारच्या गावात राहत असलेल्या एका वाहन चालकाच्या प्रेमात पडली होती. दोघंही प्रेमात असताना घरच्यांनी तिचे लग्न लावून दिली. लग्नाच्या तब्बल दीड वर्षांनंतर तिने प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. 25 दिवसांपूर्वीच विवाहित महिला तिच्या सासरहून पळून गेल्याचं सांगण्यात येतंय. इतकंच नव्हे तर, प्रियकरासोबत कोर्टात जाऊन तिने रजिस्टर मॅरेजही केले आहे. ही महिला गर्भवती असल्याचे बोलले जात आहे. 


पोलिसांत दाखल केली होती बेपत्ता झाल्याची तक्रार


विवाहिता पळून गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिस तिचा शोध घेत होते. तिला शोधण्याचा प्रयत्न सुरु असतानाच ती प्रियकरासोबत मिर्झापूर पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर ती प्रियकरासोबत लग्न करणार असल्याचे तिने म्हटले होतं. विवाहित महिलेचा हा निर्णय ऐकून तिच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला. तिचा पती, वडील व कुटुंबातील अन्य लोक तिला समजवण्याचा प्रयत्न करु लागले पण तिने कोणाचेच ऐकले नाही आणि ती प्रियकरासोबत निघून गेली.