मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. फरार नीरव मोदीला ब्रिटनमधून प्रत्यार्पित केल्यानंतर आर्थर रोडच्या बॅरेक नंबर-12 मध्ये ठेवण्याची तयारी सध्या सुरु आहे. गृह विभागाच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. आर्थर रोड जेलच्या अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेला सुरुवात देखील केली आहे. आर्थर रोड जेलची स्थिती आणि नीरव मोदीचे बॅरेक तसेच त्याला मिळणाऱ्या सुविधा या सर्वाचा विचार करण्यात आला आहे. केंद्राने देखील राज्याकडे यासंदर्भातील माहिती मागवली होती. सध्या इथल्या एका खोलीत 3 कैदी आहेत. आणि एक खोली रिकामी आहे. जर मोदी आणि माल्ल्याचे प्रत्यार्पण झाले तर दोघांना एकाच खोलीत ठेवले जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. या खोलीत तीन पंखे, सहा ट्यूब लाईट आणि दोन खिडक्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नीरव इंग्लंडच्या तुरुंगात 


नीरव मोदीला 19 मार्च रोजी लंडनच्या स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याला भारतात प्रत्यार्पित करण्याची तयारी सध्या सुरु आहे. ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने गेल्या महिन्यात मोदीची जामिन याचिका फेटाळली होती. तो सध्या इंग्लंडच्या एका तुरुंगात बंद आहे.