नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (Pm Narendra Modi Birthday) भाजपने (Bjp) 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात बूथ स्तरावर जाऊन 'सेवा पंधरवडा' अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस आहे. (preparations to make pm narendra modis birthday special bjp made this plan)


कामगार-सामान्य जनतेशी संवाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजेच 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधतील. तसेच देशातील प्रत्येक जिल्ह्यात समाजसेवेशी संबंधित कार्यक्रम आयोजित केलं जाणार आहे.


सर्व बूथवर वृक्षारोपण कार्यक्रम


या 'सेवा पंधरवडा' दरम्यान भाजपतर्फे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आणि मोफत आरोग्य प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यातील बूथवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


भारत 2025 पर्यंत टीबीमुक्त उद्दिष्टासोबतच भाजपचे कार्यकर्ते एक वर्षासाठी रुग्णाच्या आहार, पोषण आणि उपजीविकेच्या संबंधातही योगदान देतील.


2 दिवस स्वच्छता मोहीम 


भाजपचे नेते देशातील सर्व जिल्ह्यांतील कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन  आणि कार्यकर्ते सेवाकार्य करणार आहेत. विभागीय स्तरावर सर्व जिल्ह्यांमध्ये दोन दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.


भाजप जनजागृती मोहीम राबवणार


जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, भाजप देशभरात 'जल ही जीवन' आणि 'स्थानिकांसाठी आवाज' मोहिमांबद्दल तसेच भारताच्या 'विविधतेत एकता' आणि 'एक भारत, श्रेष्ठ' याविषयी जनजागृती मोहीम राबवणार आहे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समाजाला 'भारत'चा संदेश देण्यासाठी उत्सवही साजरा करणार आहे.