कोझिकोड : केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यात काही लोकांना एका दूर्मिळ आणि तितक्याच घातक व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त आहे. हा व्हायरस नेमक्या कोणत्या प्रकारचा आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, या व्हायरमुळे ३ जण ठार झाले आहेत. तर, इतर ६ जण अत्यावस्त आहेत. प्राप्त माहितीनुसार एकूण २५ लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. ते सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. केरळचे आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाची बैठक बोलावून चर्चा केली. या चर्चेनंतर या व्हायरसने तिघांचा बळी घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.


पुणे प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतिक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिपूर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीतील अहवालात खुलासा करण्यात आला आहे की, हा एक दुर्मिळ व्हायरस असून, राज्यात हा शक्यतो पहायला मिळत नाही. 'त्या' तिघांच्या मृत्यूला हा व्हायरसच जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, या व्हायरसचा नमूना पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीला पाठविण्यात आला आहे. पुण्यातील प्रयोगशाळेचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी आशा आहे.


मदतीसाठी केंद्राला पत्र


लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी हाय व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडूनही मदत मागितली आहे. त्यासाठी रमचंद्रन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांना एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात त्यांच्या लोकसभा मतदारसंघात एक विचित्र प्रकारचा व्हायरस पसरला असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.