नवी दिल्ली : देशाचे 15 वे राष्ट्रपती (15th President) कोण होणार याबाबत उत्सूकता कायम आहे. पण या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Drapadi Murmu) यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान सुरू आहे. या मतदानात एकूण 4800 निवडून आलेले खासदार आणि आमदार मतदान करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती निवडणुकीत (President election) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित असला तरी देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर आदिवासी समाजातील महिला पहिल्यांदाच विराजमान होणार आहे. 27 पक्षांच्या पाठिंब्याने द्रौपदी मुर्मू यांचा वरचष्मा आहे. तर केवळ 14 पक्षांच्या पाठिंब्याने सिन्हा यांना केवळ 3.62 लाख मते मिळण्याची अपेक्षा आहे.


पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग (Cross Voting) झाल्याची बातमी आहे. याला दुजोरा देत गुजरातमधील राष्ट्रवादीचे आमदार कंधल एस जडेजा यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे सांगितले आहे.


प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हिप बजावला असला तरी राष्ट्रवादीला (NCP MLA) झटका लागला आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातच विरोधकांना एकत्र करत त्यांनी उमेदवार दिला आहे. पण असं असलं तरी राष्ट्रवादीच्या या आमदाराने क्रॉस वोटिंग केले आहे.