नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. १७ जुलैला मतदान होणार असून २० जुलैला मतमोजणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगानं बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर केली. सद्य राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपतोय. या निवडणुकीसाठी लोकसभा - राज्यसभेचे ७७६ सदस्य तर विधानसभेचे ४१२० सदस्य मतदान करणार आहेत.


महत्त्वाच्या तारखा


- अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख २८ जून


- अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ जुलै


- राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी होणार मतदान


- २० जुलै रोजी होणार मतमोजणी


- मतदानासाठी व्हिप जारी करता येणार नाही