Edible Oil Rate Decrease : वाढत्या खाद्यतेलाची (Edible Oil ) हैराण झालेल्या जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण होऊ शकते. स्वदेशी तेलबिया (Indigenous oilseeds) मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या आहेत. त्यामुळे मागील महिन्यापर्यंत उच्चांकावर गेलेले खाद्यतेलाचे दर येत्या काळात कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. (prices expected to edible oil rate decrease ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत (India) हा जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. देशाच्या एकूण आयातीपैकी ६५ टक्के आयात पामतेलाची असते. हे पामतेल (palm oil) तयार किंवा कच्च्या स्वरूपात आयात केले जाते. भारतात पामतेलापाठोपाठ सूर्यफूल तेलाची (sunflower oil) आवक होते.


यातील ६० टक्के युक्रेनहून, तर ४० टक्के तेल रशियाहून आयात केले जाते. युद्धानंतर आता रशियाहून आयात हळूहळू सुरळीत होत आहे.अशी सर्व स्थिती असताना सध्या स्वदेशी खाद्यतेल स्थितीदेखील सुधारत आहे.


दरम्यान अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनच्या (All India Edible Oil Association) आकडेवारीनुसार, भारतात सोयाबीन तेलाची (soybean oil) मागणी मोठी असते. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशात १.९० लाख पोती (१.९० कोटी किलो) सोयाबीन बाजारात आले आहे. सोयाबीनमध्ये फक्त २० टक्के तेल असते. त्यानुसार सध्याच्या १.९० कोटी किलो सोयाबीनपासून ३८ लाख किलो तेल तयार होईल.


भारतात मोहरीच्या तेलालादेखील (Mustard oil) मोठी मागणी असते. मोहरीच्या तेलबियातून सरासरी ४० टक्के तेल निघते. त्यानुसार सुमारे ८६ लाख किलो तेल बाजारात आगामी काळात येणार असून हे चांगले संकेत आहेत, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.


...म्हणून दर कमी होतील?


देशात दरवर्षी सुमारे २.५० कोटी किलो खाद्यतेलाची (Edible Oil Rate Decrease ) मागणी असते. सध्या बाजारात आलेल्या स्वदेशी तेलबियांनुसार सुमारे १.२४ कोटी खाद्यतेल तयार होईल. तर यावर्षी जुलैमध्ये तयार पामतेलाची आयातदेखील ४३ हजार ५५५ टनांवर गेली. हा आकडा मागील जुलैमध्ये फक्त १३ हजार ८९५ टन इतका होता, तर कच्च्या पामची आयात (import) ४.८० लाख टन होती. हा आकडा मागील वर्षी जुलैममध्ये ४.५१ लाख टन होता. यामुळेच येत्या काळात खाद्यतेल दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.