Chenab Railway Bridge :  जगातील सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेला चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसांत सुरु होणार आहे. हा पूल भारताचा अभिमान ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावर रेल्वेची ट्रायल घेण्यात आली. यामुळे आता ब्रीज कधी सुरु होईल याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे. आता या पुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी यासाठी या ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली.  या मार्गावर सांगलदान-रियासी लिंकची ट्रायल रन घेतली गेली. हा ब्रिज चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे. या ट्रायल रनचा व्हिडिओ देखील रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला होता. आता रेल्वे मंत्र्यानी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात या पुलाचे अप्रतिम सौंदर्य पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ हेलॉकॉप्टरने शूट करण्यात आला आहे. Helicopter shot  - Chenab bridge असं कॅप्शन रेल्वे मंत्र्यानी दिले आहे. 13 सेकंदाच्या व्हिडिओत चिनाब ब्रीजची संपूर्ण रचना पहायला मिळत आहे. सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.   



पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा  उंच


पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरहून जास्त याची उंची आहे. अतिवेगवान वारे, तसंच भूकंपरोधक अशी याची रचना आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेल्डिंगचा यासाठी वापर करण्यात आलाय. या ब्रिजमुळे जम्मू काश्मीरची दळणवळण यंत्रणा आणकी भक्कम होणार आहे. पर्यटनालाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. तंसच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होणार आहे. तर सूरक्षा यंत्रणांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये. भुगोल आणि विज्ञानाची सगळी सर्व आव्हानं झेलत हा अतिविशाल पूल उभारला जातोय... पॅरीसचा आयफेल टॉवरही त्याच्यापुढे खुजा ठरेल. 


 


चिनाब रेल्वे पुलाचे सुंदर फोटो पाहण्यासाठी क्लिक करा... ढगांवर तरंगणारा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल! भारतीय इंजिनियर्सची कमाल, पॅरीसचा आयफेल टॉवरही याच्यापुढे खुजा ठरेल