चीनसोबत तणाव असतांना पंतप्रधान मोदी करणार म्यानमारचा दौरा
चीनसोबत वाढत असलेला तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात म्यांमारचा दौरा करणार आहेत. ६ आणि ७ सप्टेंबरला मोदी म्यांमार दौरा करणार आहेत. मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.
नवी दिल्ली : चीनसोबत वाढत असलेला तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात म्यानमारचा दौरा करणार आहेत. ६ आणि ७ सप्टेंबरला मोदी म्यानमार दौरा करणार आहेत. मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.
भारताने मागील दोन वर्षात म्यानमारमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्यात मोठं यश मिळवलं आहे. पण मोदी ज्याप्रमाणे मोठा अजेंडा घेवून जात आहे त्यामुळे म्यानमार आणि भारत यांच्यात येणाऱ्या काळात आणखी संबंध वाढणार आहेत.
म्यानमारवर चीनचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. त्यामुळे भारत मान्यमार संबंध वृद्धींगत होऊ शकले नव्हते. आता मोदींनी विविध देशांशी संबंध सुधारून चीनची कोंडी करण्याचे धोरण अवलंबले आहेत.