आंबाच नव्हे तर त्याची पाने देखील गुणकारी, 7 आजारांवर करतील मात
Mango Leaves Benefits in Marathi : आंबा चवीने खाल्ला जातो पण त्याची पाने देखील तेवढीच गुणकारी आहेत. आंब्याची पाने फक्त समारंभात वापरली जातात असं नाही. तर त्याचा औषधी वनस्पती म्हणून देखील वापर केला जातो.
उन्हाळा म्हटलं की, आंबा चवीने खाल्ला जातो. पण या दरम्यान आंब्याच्या पानांचे सेवन खूप फायदेशीर ठरते. भारतातील अनेक राज्यांमध्ये आंब्याची पाने शिजवून खाल्ली जातात. आंब्याच्या पानांचे थेट सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट यांच्या मते, आंब्याची पाने अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जातात. कारण त्यांच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे जसे की अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स, अल्कलॉइड्स, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी देखील मुबलक प्रमाणात असते. याशिवाय आंब्याच्या पानांमध्ये टेरपेनॉइड्स आणि पॉलिफेनॉल संयुगे असतात. जर तुम्ही आंब्याची पाने नियमितपणे खाल्ले तर ते तुम्हाला अनेक समस्यांपासून बचाव आणि उपचार करण्यात खूप मदत करू शकते.