फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?

फायर फायटर हे अत्यावश्यक कठीण परिस्थितीतही काम करण्यास सज्ज असतात. लोकांना प्रशिक्षित करण्यासोबत तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. 

| May 03, 2024, 16:36 PM IST

International FireFighters Day: फायर फायटर हे अत्यावश्यक कठीण परिस्थितीतही काम करण्यास सज्ज असतात. लोकांना प्रशिक्षित करण्यासोबत तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. 

1/8

फायर फायटर बनण्यासाठी किती शिक्षण आवश्यक, किती मिळतो पगार?

International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

FireFighter Career Details:आगीशी खेळून लोकांचे जीवन वाचवण्याचे काम फायर फायटर करतात. लोकांचे जीव वाचवणे हे फायर फायटरचे मुख्य काम असते. तसेच सामानाची सुरक्षा करणे, जंगल, शहरे, गाव, कंपन्या, फॅक्टरी अशा अनेक ठिकाणी अचानक आग लागल्यावर फायर फायटर महत्वाची भूमिका बजावतात. अत्यावश्यक कठीण परिस्थितीतही काम करण्यास ते सज्ज असतात. लोकांना प्रशिक्षित करण्यासोबत तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते.

2/8

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे काम

 International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

आग, तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे काम फायर फायटर म्हणजेच अग्निशमन जवान करतात. दहावी, बारावीला असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अग्निशमन दलात नोकरी हवी असते. पण यासाठी नेमकं शिक्षण किती लागत? या पदासाठी किती पगार मिळतो? हे अनेकांना माहिती नसतं. याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

3/8

शिक्षण

International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

फायर फायटर बनण्यासाठी उमेदवार दहावी, बारावी, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी अर्ज करु शकतात. यानंतर अग्नि सुरक्षा आणि इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागेल. अग्नि सुरक्षा आणि धोका प्रबंधनमध्ये बीएससी, फायर इंजिनीअरिंगमध्ये बीटेक आणि सुरक्षा प्रबंधनमध्ये एमबीए असणे आवश्यक आहे. किंवा तुम्ही डिप्लोमादेखील करु शकता. 6 महिन्यापासून 3 वर्षांपर्यंत हे कोर्स असतात. 

4/8

अभ्यासक्रम

International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

उमेदवारांना सेंट्रल फायर सेफ्टी इंस्टिट्यूट, आयकॉन इंस्टिट्यूट ऑफ सेफ्टी ट्रेनिंग, दिल्ली इंस्टिट्यूट ऑफ फायर इंजिनीअरिंग आणि आयआयडी खरगपूर अशा अनेक कॉलेजमध्ये तुम्हाला फायर फायटर संदर्भात अभ्यासक्रम मिळेल. 

5/8

कोणते गुण असावेत?

International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

तुमची शरीरयष्टी आणि वैचारीक क्षमता मजबूत असणे आवश्यक आहे. तुम्ही वेळेचे पक्के असावेत. तसेच तुम्हाला टिम वर्कमध्ये विश्वास असावा. 

6/8

नोकरीचे अनेक पर्याय

International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

फायर अॅण्ड सेफ्टी कोर्स केल्यानंतर तुमच्या समोर सेफ्टी मॅनेजर, सेफ्टी एचओडी, सेफ्टी ऑफिसर, सेफ्टी ऑडीटर, फायर सेफ्टी सुपरवायझर, सेफ्टी एडव्हायझर कन्सल्टंट, टेक्निकल सर्व्हिस मॅनेजर, फायर इंजिनीअर, सुरक्षा इंजिनीअर, फायर सब ऑफिसर, फायर ऑडिटर, फायरमन, लिडींग हॅंड, फायर ऑपरेटर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायर इंचार्ज, सेफ्टी इंचार्ज असे पर्याय उपलब्ध असतात. 

7/8

नोकरीच्या संधी?

International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

फायरमन म्हणजे केवळ अग्नीशमन दलात नोकरी एवढेच नसते. तर तुमच्यासमोर नोकरीचे अनेक पर्याय खुले असतात. भारतीय अंतराळ अनुसंधान केंद्र, एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया, टेक्सटाइस कॉटन इंडस्ट्रीज, डिफेन्स सर्व्हिस, नगर पालिका, पालिता निगम, थर्मल पॉवर स्टेशन, इंडियन नेव्ही, एअर फोर्स, एअरपोर्ट, शिपिंग कॉर्पोरेशन, पॉवर प्लांट, स्टील प्लांट, पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाइल मिल आणि रिफायनरी या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते.

8/8

पगार

International FireFighters Day Fire Fighter Education Salary Career Details

फायरमन म्हणून निवड झाल्यावर तुम्हाला वार्षिक 2.5 लाख ते 8 लाख पर्यंत पगार मिळू शकतो. एवढेच नव्हे तर यासोबत अनेक सुविधादेखील दिल्या जातात. ज्ञान आणि कोशल्यामुळे अग्निशमन जवानांना मिळणारे मानधन इतरांच्या तुलनेत जास्त असते.