पंतप्रधान मोदी आज 6 वाजता करणार देशाला संबोधित
पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वपूर्ण घोषणा करून देशातील जनतेला सूचना देऊ शकतात. कोरोना व्हायरसविरूद्ध सुरू असलेल्या युद्धाबद्दल देशातील लोकांना जागरूक करण्याचीही शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'आज मी संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करणार आहे. मी माझ्या देशवासियांना एक संदेश देणार आहे. आपणही सामील व्हा.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला काय संदेश देणार याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. भारतात कोरोना संक्रमण सुरू झाल्यापासून पंतप्रधानांनी बर्याच वेळा राष्ट्राला संबोधनले आहे. मार्च महिन्यात याची सुरूवात झाली होती. 19 मार्च रोजी त्यांनी जनता कर्फ्यूसाठी लोकांना आवाहन केले. यानंतर, 24 मार्च रोजी देशाला दिलेल्या भाषणात त्यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. नंतरच्या देशाला संबोधित करताना त्यांनी स्वावलंबी भारत अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.