मुंबई :  पुढच्या दीड वर्षात दहा लाख सरकारी नोकरी (Government Job) देण्याचं मिशन मोदी सरकारनं (Narednra Modi) निश्चित केलंय. त्याचाच एक भाग म्हणून 71 हजार तरुणांना आज नियुक्तीपत्रं (Appontment Letter) देण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ही 71 हजार नियुक्तीपत्रं देण्यात आली. पाहुयात एक रिपोर्ट. (prime minister narendra modi alloted job offer letter to freshers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं मिशन सरकारी नोकरी हातात घेतलंय. आगामी दीड वर्षात 10 लाख सरकारी नोकरी देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी केली होती. याच मिशनचा एक भाग म्हणून 71 हजार तरुणांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली. केंद्र सरकारच्या 38 मंत्रालयांधल्या विविध विभागांसाठी ही नोकरभरती झाली. यात यशस्वी उमेदवारांना मोदींनी नियुक्तीपत्रांचं वाटप केलं.


ऑक्टोबर महिन्यात याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच 75 हजार नियुक्तीपत्रांचं वाटप स्वत: पंतप्रधान मोदींनी केलं होतं. आता 71 हजार नियुक्तीपत्रांचं वाटप मोदींनी केलंय. महाराष्ट्रातूनही हजारो तरुणांना या मिशन अंतर्गत सरकारी नोकरी मिळालीय.


केंद्रीय सशस्त्र बल, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, रेल्वे अशा विभागात मोदी सरकारनं नोकरभरती सुरु केली. त्यात जे उत्तीर्ण झाले त्यांना स्वत पंतप्रधान मोदी नियुक्तीपत्रांचं वाटप करतायत. 10 लाख सरकारी नोक-यांचं मिशन मोदी सरकारनं ठरवलंय.