मुंबई : पंतप्रधानांची नौशेरात सैनिकांसह दिवाळी साजरी केली. सैनिकांच्या शौर्याला मानवंदना दिला. आज पंतप्रधान मोदी केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत. आद्य शंकराचार्यांच्या समाधी, मूर्तीचं मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. 82 तीर्थक्षेत्रांवर आज कार्यक्रम होणार आहे. केदारनाथमध्ये 200 कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथमध्ये दाखल झालेत. मोदींच्याहस्ते आज केदारनाथमध्ये आद्य शंकराचार्यांच्या समाधीचं आणि मूर्तीचं अनावरण होणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम इथं झालेल्या 200 कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन तसंच 200 कोटींच्या विकास कामांचं भूमीपूजन होणार आहे.



या क्रायक्रमानिमित्त आद्य शंकराचार्यांनी पदस्पर्श केलेल्या तिर्थ क्षेत्र तसंच बारा ज्योतिर्लींग अशा 82 तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाजपकडून देशव्यापी कार्यक्रम केला जाणार आहे.



यात महाराष्ट्रातील औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर,परळी वैजनाथ, तसंच पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर इथं कार्यक्रम होणार आहे.