काय रे माझं नशीब...कारागृहातून पळून सुद्धा अडकलो `या` जाळ्यात...
वाईट कृत्य करणाऱ्यांना देव पण माफ करत नाही असं म्हणतात. अशीच विचित्र घटना समोर आली आहे.
Trending News - वाईट कृत्याचे परिणाम कायम वाईट होतात. म्हणूनच म्हणतात कधीही कोणाचं वाईट करु नका. आपण मुलांना कायम शिकवतो चुकीच्या गोष्टी करु नका, चोरी करु नका किंवा खोटं बोलू नका. चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना आपल्या समाजात न्यायालयाकडून शिक्षा मिळते. वाईट कृत्य करणाऱ्यांना देव पण माफ करत नाही असं म्हणतात. अशीच विचित्र घटना समोर आली आहे.
आसमान से टपका खजूर में अटका
एक कैदी कसा तरी कारागृहाची भिंत ओलांडून बाजूला असलेल्या सरकारी परिसरात लपून बसतो. मात्र पोलीस त्याचा पाठलाग करतात हे त्याचा लक्षात येतं. म्हणून पोलिसांपासून आपला बचाव करण्यासाठी हा कैदी झाडाचा आसरा घेतो. तो झाड्यावर चढून एका फांदीवर जाऊन बसतो. पोलीस त्या कैद्याला खाली येण्यास सांगतात. पण तो खाली उतरण्यास तयार नसतो. त्या कैद्याला खाली उतरविण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवले जाते. अग्निशमन दलाचे तीन अधिकारी झाडावर जाऊन त्याला पडकण्याचा निर्णय घेतात. जसे हे अधिकारी झाडावर चढायला सुरुवात करतात, तसा हा कैदी एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर उडी मारतो आणि 'आसमान से टपका खजूर में अटका' यासारखी त्याची गत होते.
इकडे आड तिकडे विहीर
जसं अधिकारी झाड्यावर चढायला लागतात तसं या कैद्याने दुसऱ्या फांदीवर उडी घेतली आणि ती फांदी तुटली. फांदी तुटल्यामुळे हा कैदी थेट पोलिसांच्या जाळ्यात अडून पडला. या घटनेनंतर त्याने म्हटलं असेल की, काय माझं नशीब पोलिसांपासून पळून सुध्दा परत काही क्षणात त्यांचा जाळ्यात अडकलो गेलो. केरळमधील तिरूवनंतपुरममधील तुरुंगातील ही घटना आहे. हा कैदी या तुरुंगात हत्येचा गुन्हेखाली शिक्षा भोगत होता. आता या कैद्यावर तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.