नवी दिल्ली : काही आठवड्यांपुर्वी तुरुंगात मुन्ना बजरंगीच्या हत्येमुळे उत्तर प्रदेश पोलिसांची नाचक्की झाली. या घटनेतुनही युपी पोलिसांनी काही शिकवण घेतली नाही. आता तुरुंगातील कैद्यांसंबधित आणखी एक प्रकरण समोर आलंय. या घटनेमुळे तुरूंगातील पोलीसांच्या चौकशी आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. फैजाबादच्या जेलमधला एक व्हिडिओ समोर आलायं. यामध्ये एक कैदी आपला वाढदिवस साजरा करताना दिसतोय आणि त्याच्या वाढदिवसाची सारी तयारी जेलरने केलीयं.


लाखाच्या बदल्यात वाढदिवस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवेंद्र सिंह असे या कैद्याचे नाव असून त्याने फैजाबादच्या जेलमध्ये २३ जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. जेलर विनय कुमारने वाढदिवसाच्या सर्व वस्तू पुरवल्या आणि कर्मचाऱ्यांनी माझा व्हिडिओ बनवल्याचे कैदी शिवेंद्र सिंहने सांगितले. यासाठी माझ्याकडुन १ लाख रुपये घेतल्याचेही त्याने सांगितले.



युपी पोलीस बदनाम


युपी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याच महिन्यात गॅंगस्टर प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीला बागपत जिल्ह्यामध्ये गोळी मारण्यात आली होती. मुन्ना बजरंगीला दुसरा कैदी गॅंगस्टर सुनील राठीने गोळी मारली. सुनील राठीकडे बंदुक कुठुन आली ? हा गंभीर प्रश्न नंतर उपस्थित झाला. याप्रकरणी जेलर, डेप्युटी जेलर, वार्डन आणि हेड वार्डनला तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं.