मुंबई : प्रियंका चोप्रा आणि करण जोहर यांच्यासह रोहित शेट्टी एका शोमध्ये पोहोचले होते. 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार'च्या सेटवर यांनी खूप धमाल केली. पण त्या दरम्यान प्रियंकाने करण जोहरच्या कानाखाली वाजवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' हा करणचा आवडता सिनेमा आहे. रोहित शेट्टी, करण जोहर आणि प्रियंका चोपडा यांनी या सिनेमाचं एक सीन करण्याचं ठरवलं. या दरम्यान प्रियंकाने करणच्या कानाखाली वाजवली.


करण जोहर, रोहित शेट्टी आणि प्रियंकाने स्टेजवर या सिनेमाशी संबंधित एक केला. सिनेमामध्ये करण जेव्हा बियर घेण्यासाठी जातो तेव्हा तो सुरुवातील रिकाम्या हाती माघारी येतो. त्यामुळे त्याला कानाखाली खावी लागते.


आता हा सीन पुन्हा या सेटवर केला जात होता. या सीनमध्ये शाहरुख खानचा रोल प्रियंका चोप्रा करते. अमरेश पुरीचा रोल रोहित शेट्टी करतो तर करण जोहर स्वतःचा रोल करतो. प्रियंका यानंतर मग करणला कानाखाली वाजवते. प्रियंका चोप्राने म्हटलं की, ती नेहमी असं काही करु इच्छित होती ज्यामुळे तिला करणला कानाखाली वाजवता आली असतं. हा फक्त एक मनोरंजनाचा भाग होता.