नवी दिल्ली : मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे. प्रियंका गांधी- वाड्रा एका नोटीशीला उत्तर देताना म्हणाल्या की, जनतेची एक सेविका या नात्याने माझे कर्तव्य उत्तर प्रदेशच्या जनतेप्रती आहे आणि ते कर्तव्य आहे सत्य लोकांसमोर ठेवणे, हे माझे काम आहे. कोणत्या सरकारी कामांचा प्रचार करणे हे माझे काम नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर माझ्यावर कारवाई करायची असेल तर ती बिनधास्त करा. मी काही घाबरत नाही. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार आपल्या इतर विभागांद्वारे व्यर्थ धमक्या देत आपला वेळ वाया दवडत आहे, असे त्या म्हणाल्यात. त्याचवेळी भाजपला टोला लगावला. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसारखी मी काही भारतीय जनता पक्षाची अघोषित प्रवक्ता नाही.



कानपूरमधील एका वसतिगृहात गेल्या काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. वसतिगृहातील ५७ मुलींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाली. या व्यतिरिक्त यातील एकूण ५ मुली गरोदर असल्याचेही स्पष्ट झाले होते. यानंतर हा मुद्दा प्रियंका गांधी- वाड्रा उपस्थित करत होत्या.


काही दिवसांपूर्वी  प्रियंका गांधी- वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर कानपूर वसतिगृहात अल्पवयीन मुली गरोदर राहण्यावर आणि विशेषत: एचआयव्ही आणि हेपेटायटीससीचा संसर्ग होण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्तर प्रदेशच्या प्रदेश बाल संरक्षण आयोगाना प्रियंका यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशबाबत संताप व्यक्त केला.