जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांवर दगडफेक
शोपियामध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा रक्षकांनी रविवारी सकाळी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कारवाई करुन परत येत असताना सुरक्षा रक्षकांवर स्थानिकांनी दगडफेक केली. सुरक्षा रक्षकांच्या गाड्या शहरातून जात असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा रक्षकांनी रविवारी एनकाउंटरमध्ये 6 दहशतवाद्यांना ठार केलं. हा एनकाउंटर बटागुंडमध्ये झाला. सुरक्षा रक्षकांनी 6 दहशतवाद्यांपैकी 4 दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या कारवाई दरम्यान 1 जवान शहीद झाला आहे.
सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सुरक्षा रक्षकांना या भागात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा रक्षकांनी शोध अभियान सुरु केलं आणि या दहशतवाद्यांना खात्मा केला.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षकांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आजाद मलिक, उनीस शाफी, शाहिद बशीर, बासित इश्तियाक, आकिब नजर आणि फिरदौस नजर असं या दहशतवाद्यांचं नाव होतं. यामध्ये आजाद मलिक उर्फ आजाद डाडा पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येत सहभागी होता.