नवी दिल्ली : कोरोना काळात विमान प्रवास सुरक्षित करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयने  Ministry of Civil Aviation मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी दिले जाणारे इयरफोन डिस्पोजल असणं गरजेचं आहे. जर प्रवाशांना हेडफोन दिले जात असतील तर ते योग्यरित्या सॅनिटाईज करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानात प्रत्येक आसन व्यवस्थेला इंटरटेन्मेंट सिस्टम लावलेलं असतं. यात प्रवासी आपल्या आवडीची गाणी, मूव्ही किंवा रेकॉर्डेड प्रोग्राम पाहू शकतात. हे कार्यक्रम पाहण्यासाठी प्रवाशांना विमान कंपन्यांकडून इयरफोन किंवा हेडफोन दिले जातात. प्रवासानंतर प्रवासी ते हेडफोन किंवा इयरफोन जागेवर ठेऊन जातात. परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, मंत्रालयाने डिस्पोजेबल इयरफोन किंवा हेडफोन असल्यास ते सॅनिटाईज करण्याचे निर्देश दिले आहेत. 


विमान कंपन्यांनी कोरोना काळात प्रवासादरम्यान नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सामान्यपणे विमानातून जेलसारखे लिक्विड पदार्थ 100 एमएलहून अधिक घेऊन जाण्यास परवानगी नसते. परंतु कोरोना काळात 350 एमएलची सॅनिटायझरची बाटली केबिन बॅगेजमध्ये घेऊन जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. सॅनिटायझरशिवाय इतर लिक्विड पदार्थ घेऊन जाण्याची अधिकाधिक मर्यादा 100 एमएलपर्यंतच आहे.


प्रवाशांना देशांतर्गत विमान प्रवास करताना किंवा देशाबाहेर वंदे भारत अभियानांतर्गत प्रवास करताना, आपला भारतीय मोबाईल क्रमांक, तिकीट बुक करताना देणं अनिर्वाय आहे. विमान कंपन्यांकडून प्रवाशांचा रेकॉर्ड ठेवला जात आहे. जेणेकरुन गरज पडल्यास त्यांना संपर्क केला जाऊ शकतो. 


विमान प्रवासादरम्यान, थकवा, ताप, अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास याची माहिती त्वरित केबिन क्रूला देणं गरजेचं आहे. विमानात अशाप्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी केबिन क्रूला खास ट्रेनिंग देण्यात आलं आहे.