चार दशतवाद्यांचा खात्मा, नागरिकांची जवानांवर दगडफेक
जम्मू-काश्मीरमध्ये जवानांनी जोरदार कामगिरी करत चार दहशतवाद्यांना ठार केलेय. मात्र, कुपवाडा या ठिकाणी जवानांवर नागरिकांनी दगडफेक केली.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी जोरदार कामगिरी करत चार दहशतवाद्यांना ठार केलेय. मात्र, कुपवाडा या ठिकाणी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जवानांवर नागरिकांनी दगडफेक केल्याने तणावात भर पडलेय. जम्मू-कश्मीरमध्ये रजमानमध्ये पुकारण्यात आलेली एकतर्फी शस्त्रसंधी संपल्यापासून लष्कराचे केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट सुरु झाले आहे. आज शुक्रवारी पुलवाला जिल्ह्यामध्ये लष्करी जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलेय.
पुलवामामध्ये तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कराने शोधमोहीम राबवत तिघांना ठार केले. दहशतवादी एका घरामध्ये लपून बसले होते आणि काही लोकांना त्यांनी बंदी केले होते. त्यामुळे लष्कराला कारवाईमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. शुक्रवारी दुपारपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरु होती. सायंकाळी जवानांना तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले.
दमरम्यान, कुपवाडात एक दहशतवादी ठार करण्यात आलाय. शुक्रवारी कुपवाडामध्ये लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केले. ही चकमक सुरू असताना स्थानिकांनी लष्कराच्या जवानांवर दगडफेक केली. यात १० लोक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला.