नवी दिल्ली : काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी वेदनादायी ठरला. देशात ४० ठिकाणी ४० वीर जवानांच्या धगधगत्या चिता पाहण्याचा दुर्देवी प्रसंग भारतीयांवर ओढवला. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना साश्रू नयनांनी निरोप दिला. यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील नितीन राठोड आणि संजयसिंग राजपूत या दोन सुपुत्रांनाही वीरमरण आले. त्यांच्यावर आज संध्याकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नितीन राठोड, संजयसिंह राजपूत अमर रहे'च्या घोषणा आणि साश्रुनयनांनी या वीरपुत्रांना अखेरचा निरोप देण्यात आला. तसेच देशातही दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शासकीय इतमामानात अंत्यसंस्कार कऱण्यात आले. पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, वाराणसी, कर्नाटक, राजस्थान, आसाम, हिमाचल प्रदेश, ओदिशा, बिहार, तामिळनाडू या ठिकाणी देशाच्या खऱ्या हिरोंना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सर्व शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


मध्य प्रदेश




महाराष्ट्र


ज्म्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही सुपुत्रांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातले मलकापूरचे संजय राजपूत आणि चोरपांगरा गावातले नितीन राठोड या दोघांना संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला लाखोंच्या जनसमुदायानं साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. काश्मिरातल्या पुलवामात दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले... त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच गहिवरून आलं.



कर्नाटक



मध्य प्रदेश



हिमाचल प्रदेश



पश्चिम बंगाल


पुलवामा हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येतोय. पश्चिम बंगालमध्येही हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या होत्या. तसंच काळ्या फिती लावूनही हल्ल्याचा निषेध करण्यात आला. 



जम्मू-काश्मीर



ओदिशा



प्रयागराज



बिहार



बिहार




तामिळनाडू





राजस्थान




मध्य प्रदेश