लंडन : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जगभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी भारतीय शहिदांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या तसेच दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानलाही खडसावले. या घटनेचे पडसाद लंडनमध्ये उमटले.  या पार्श्वभूमीवर लंडन सरकारनेही आपल्या नागरिकांना जम्मू काश्मीरच्या काही भागात न जाण्याचे निर्देश जारी केले आहेत. शनिवारी लंडनमधील भारतीय निवासितांनी पाकिस्तान उच्चायोग बाहेर जोरदार प्रदर्शन केले. या हल्ल्याप्रती सर्वांच्याच भावना तीव्र आहेत. हा हल्ला करुन दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यानंतर अनेक देशांनी निषेध नोंदवला. ब्रिटन परराष्ट्र मंत्रालय तसेच राष्ट्रमंडळ कार्यालयाने (एफसीओ) निर्देश जारी करत पाकिस्तानशी संलग्न असलेल्या सिमांवर आणि पर्यटन स्थळांवर जाऊ नका असे आपल्या नागरिकांना बजावले. वाघा तसेच जम्मू काश्मिर येथे फिरू शकता, वायू मार्गाचा वापर करु शकता तसेच लडाखमध्ये प्रवास करु शकता असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. 



एफसीओने ब्रिटीश नागरिकांना पहलगाम, गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या पर्यटनस्थळी न जाण्याचा सल्ला दिला आहे. श्रीनगर जाणे शक्यतो टाळा,जाणे खूपच गरजेचे असेल तरच जावे  असा आदेश ब्रिटन परराष्ट्र मंत्रालयाने जारी केला आहे. तसेच जम्मू आणि श्रीनगरमधील राष्ट्रीय महामार्गवर जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.


७ जणांना अटक 



१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षादलाकडून कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. या कारवाई दरम्यान सुरक्षादलाकडून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सतत छापेमारी सुरू आहे. सिंबू नबल येथून ६ जण तर लारू भागातून एकाला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय शोध पथकाकडून (एनआयए) ही कारवाई करण्यात येत आहे. एनआयएची टीम आणि जम्मू-काश्मीर पोलिस एकत्रितपणे कारवाई करणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (एनएनजी) विशेषज्ञांची टीमही पुलवामात घटनास्थळी दाखल झाली असून शोधकार्य सुरू आहे.