Exit Poll : पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली असून पंजाबमध्ये (Punjab Assebly Election) मोठा उलटफेर पाहिला मिळण्याची शक्यता आहे. Exit Poll च्या पंजाबमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बहुमत मिळण्याचा अंदाज Exit Poll मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 


एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपला 52 ते 61 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.


तर काँग्रेसला 26 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याखालोखाला शिरोमणी अकाली दलाला 24 ते 32 जागा मिळू शकतात. भाजपाला मात्र पंजाबमध्ये दुहेरी आकडाही गाठता येणं अशक्य असल्याचं दिसतंय. Exit Poll च्या आकडेवारीनुसार पंजाबमध्य भाजपाला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर इतर पक्षांना 1 ते 2 जागा मिळतील.


पंजाबमध्ये 2017 मध्ये कोणाला किती जागा?


पंजाब -  (2017) एकूण जागा - 117  


काँग्रेस  -                         77
शिरोमणि अकाली दल   -  15
भाजप -                         03
आम आदमी पार्टी      -     20
अन्य                 -           02