Punjab Election date : पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख पुढे ढकल्याचा निर्णय  निवडणूक आयोगाने घेतला आहे. आता 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतदानाची तारीख बदलण्याबाबत अनेक राजकीय पक्षांकडून पत्रं आल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची बैठक पार पडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारणासाठी तारीख बदलली
काँग्रेस, भाजप आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसने 14 फेब्रुवारीला रविदास जयंती असल्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख 14 फेब्रुवारी ठेवू नये यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. अनुसूचित जातीचे लोक त्या दिवशी राज्याबाहेर असतील. ते यूपीतील वाराणसीला जाऊ शकतात. अशा परिस्थितीत ते लोक मतदान करू शकणार नाहीत आणि मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती.


आता मतदान किती तारखेला
पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. यापूर्वी, निवडणूक आयोगाने 14 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 10 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाईल, असं म्हटलं होतं.  मात्र, आता बदलेल्या तारखेनुसार 16 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 10 मार्चला मतमोजणी होईल.


पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पार्टी, अकाली दल आणि भाजप-पंजाब लोक काँग्रेस या महाआघाडीत चुरशीची स्पर्धा मानली जात आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे.