चंदीगढ : Bhagwant Mann's Wedding Updates: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी गुरुवारी डॉ. गुरप्रीत कौर ( Dr Gurpreet Kaur) यांच्याशी त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी एका समारंभात लग्न केले. आपचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) आणि जवळचे मित्र खासदार राघव चढ्ढा ( Raghav Chadha) या लग्नाला उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (48) वर्षीय असून त्यांनी आधी कॉमेडियन म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते राजकारणात आले. हरियाणातील कुरुक्षेत्रातील पेहोवा येथील डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी त्यांनी आता विवाह केला आहे. मान यांचे हे दुसरे लग्न आहे. 2015 मध्ये ते त्यांच्या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुल आहेत. मुलगी सीरत कौर (21) आणि मुलगा दिलशान (17) आहे. त्यांची पहिली पत्नी ही मुलांसह अमेरिकेत राहत आहे. लग्नाला मान यांची आई, बहीण, नातेवाईक आणि काही पाहुणे यांसह केवळ कुटुंबातील सदस्य उपस्थित  होते.



वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा सोहळा पार पडला. गुरप्रीत कौर (30) यांनी ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘Din Shagna Da Chadya’ (लग्नाचा दिवस आला आहे). आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्यांच्या अभिनंदन संदेशांसाठी तिने त्यांचे आभार मानले.



गुरप्रीत कौरने 2018 मध्ये हरियाणातील एका खासगी विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण केले. तिला दोन मोठ्या बहिणी आहेत ज्या परदेशात स्थायिक आहेत. आपच्या म्हणण्यानुसार, मानचे कुटुंबीय, त्यांची आई आणि बहीण आणि काही पाहुणे या लग्नाला उपस्थित होते. हा विवाह शीख विधींनुसार पार पडला.