`या` बॅकेतील खातेधारकांना अलर्ट; महत्त्वाच्या माहितीची पूर्तता करा, अन्यथा...
PNB : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
PNB: भारतातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने काही नियम बदलले आहेत. तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असल्यास आणि तुम्ही अद्याप तुमच्या खात्यात KYC (Know Your Customer-KYC) अपडेट केलेले नसेल. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण PNB ने आपल्या ग्राहकांना खात्यांच्या KYC साठी आज (12 डिसेंबर ) ही अंतिम तारीख दिली होती. याचा अर्थ असा की तुम्ही या तारखेपर्यंत तुमच्या खात्यातील केवायसी अपडेट न केल्यास तुम्हाला व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात.
बँकेच्या वतीने ट्विट करण्यात आले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व ग्राहकांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. केवायसी अपडेटसाठी बँक कधीही ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीसाठी कॉल करत नाही किंवा विनंती करत नाही. 12 डिसेंबर 2022 ही ग्राहकांसाठी KYC अपडेट पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यात केवायसी अपडेट केले नाही तर त्याच्या खात्याच्या ऑपरेशनवर बंदी घातली जाऊ शकते.
केवायसी अपडेट झाले आहे की नाही हे कसे ओळखणार?
KYC तुमच्या खात्यात अद्ययावत आहे की नाही याबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांक 1800 180 2222/ 1800 103 2222 (टोल-फ्री) / 0120-2490000 (टोल क्रमांक) यांच्याशी संपर्क साधू शकता.
वाचा: कोणतीही माहिती प्रेसला देऊ नये अन्यथा...; इलॉन मस्कची Twitter कर्मचार्यांना धमकी
केवायसी कसे अपडेट करावे?
केवायसी अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे पॅन, (Pancard) आधार क्रमांक (Adhar Card) आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा KYC ऑनलाइन किंवा जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अपडेट करू शकता.
रिझर्व्ह बँकेचा सल्ला
दरम्यान, वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी अपडेट करण्यास सांगत असत. मात्र आता अनेक बँका तीन वर्षांच्या अंतरानंतरही ते अपडेट करण्यास सांगत आहेत.