नवी दिल्ली : जर तुम्ही पंजाब नॅशलन बॅंकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचे महत्त्वाचे काम २५ जानेवारीपर्यंत करणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला पुढे अन्य समस्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून बॅंकेकडूनच सर्व ग्राहकांना असे आवाहन करण्यात आले आहे.


काय आहे कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बॅंक २९ जानेवारीपासून आपली कोर बॅंकींग सिस्टम अपग्रेड करेल. यामुळे २९ आणि ३० तारीखेला तुमची महत्त्वाची कामे करण्यास अडसर येऊ शकतो.


त्याचबरोबर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त बॅंका बंद राहतील. त्यानंतर २७-२८ ला चौथा शनिवार-रविवार आल्याने बॅंका बंद राहतील. त्यानंतर बॅंकेचे अपग्रेडचे काम सुरू होईल आणि त्यामुळे तुमची महत्त्वाची कामे होण्यास वाट पाहावी लागेल. म्हणून २५ जानेवारीपूर्वी तुमची महत्त्वाची कामे उरकून घ्या.