अमृतसर : भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी आंतरराष्ट्री रेल्वे गेटमधून घुसखोरी करणाऱ्यास सुरक्षारक्षकांनी ठार केले आहे. गेट नंबर १०३ मधून पाकिस्तानातून तो भारतात येण्याच्या प्रयत्नात होता. त्याचे नाव गुलनवाज असून तो पाकिस्तानचा नागरिक असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तात्काळ बीएसएफ जवानांनी रेंजर्सना सोबत पाकिस्तानशी फ्लॅग मिटींग करत ही माहिती देत याची ओळख पटवण्यास सांगितले पण त्यांनी तसे करण्यास नकार दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉईंट चेकपोस्ट अटारीवर बीएसएफ जवान संध्याकाळी ड्यूटी करत होते. त्यावेळी पाकिस्तानच्या दिशेने एका इसमास घुसखोरी करताना पाहीले. बीएसएफने ते माघारी जाण्याची सूचना केली. पण त्या घुसखोराने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर बीएसएफने त्याच्यावर फायरिंग केली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर तात्काळ बीएसएफचे डीआयजी जेएस ओबराय यांच्यासहित अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. 



या मृतदेहाजवळ त्यांना एक बॅग सापडली. त्या बॅगमध्ये कपडे, पाकिस्तानी करंसीचे १६० रुपये (यामध्ये ५०-५० च्या तीन नोटा आणि पाचची दोन नाणी), एक पर्स, एक सिम कार्ड, एक मेमरी कार्ड, एक लाइटर आणि एक सिगारेटचे पाकिट सापडले.