नवी दिल्ली : जम्मू कश्मीरमधून अनुच्छेद 370 काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु आहे. पंजाबच्या पटियालामध्ये मात्र जल्लोष करत असताना शिवसेनेच्या 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमधील लोकांना आवाहन केलं आहे की, नाजूक परिस्थितीमुळे या मुद्द्यावर जल्लोष करु नका आणि या निर्णयाला विरोध ही करु नका. पण पटियालाच्या पातडामध्ये शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोश केला आणि लाडू देखील वाटले. यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पंजाब पोलिसांनी वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं कळतं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना कोर्टात सादर केलं जाणार आहे.


सोमवारी भारत सरकारने अनुच्छेद 370 संपवत असल्य़ाची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा हा कायदा मोदी सरकारने काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून अनेकांनी याचं स्वागत केलं आहे. जम्मू-काश्मीर आता राज्य नसून केंद्र शासित प्रदेश बनणार आहे. सोबतच लद्दाख हे वेगळं केंद्रशासित प्रदेश असणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा असेल पण लद्दाखमध्ये विधानसभा नसणार आहे.


जम्मू-काश्मीरचा हा विशेष दर्जा काढून घेण्याचा संकल्प सोमवारी राज्‍यसभेत केल्यानंतर आज लोकसभेत यावर चर्चा होणार आहे.