देशभरात वाढत्या अत्याचारांच्या घटना सध्या काळजीचा विषय बनला आहे. अनेकदा नात्याला काळीमा फासणाऱ्या घडणाऱ्या घडल्याचे आपण पाहतोय. अनेकदा अनैसर्गिक संबधांच्या अनेक घटना पाहायला मिळत आहे. पण पंजाबमध्ये (Punjab) घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसलाय. पंजाबमधील जालंधर शहरात एका व्यक्तीचे चार मुलींनी अपहरण (kidnap) केल्याची घटना समोर आली आहे. कारखान्यातील एका कामगाराने कारमधून आलेल्या 4 मुलींनी अपहरण केल्याचा आरोप केला आहे. मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही कामगाराने केला आहे. कामगाराच्या या दाव्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय. (Punjab youth claims that he was sexually harassed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र कामगाराच्या या आरोपांना कोणीही दुजोरा दिलेला नाही तसेच याप्रकरणी त्याने कोणतीही तक्रार देखील दाखल केलेले नाही. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या कामगाराने एका स्थानिक माध्यमासोबत बोलताना हे आरोप केले आहेत. पण यानंतर इतर माध्यमांनी त्याच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा या कामगाराने पळ काढलाय. त्यामुळे त्याने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.


माध्यमांच्या वृत्तानुसार, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चार मुलींनी या 23 वर्षीय तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दारू पाजली आणि त्याच्यावर लैगिंक अत्याचार केले. या तरुणाने त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत असे सांगितले आहे. जीव वाचला हेच महत्त्वाचे आहे असे म्हणत या तरुणाने तक्रार करण्यास नकार दिला आहे.


दरम्यान, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावत यात काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. असे असते त्याने तक्रार करायला हवी होती, असे पोलिसांनी म्हटले. मात्र झी 24 तास या बातमीची पुष्टी करत नाही.