नवी दिल्ली: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे जेएनयूमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. या पोस्टर्सवरील आक्षेपार्ह मजकूर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जेएनयूच्या परिसरात तोकडे कपडे घालण्यास मज्जाव करण्यात येईल. तसेच देशद्रोही कॉम्रेडसना विद्यापीठाच्या परिसरात येण्यापासून रोखले जाईल व विद्यापीठाच्या परिसरातील मांसाहारी खानावळी बंद केल्या जातील, असा मजकूर या बॅनर्सवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, अभाविपने आपण हे बॅनर्स लावले नसल्याचे स्पष्ट केले. डाव्या संघटना घाबरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आमची बदनामी केली जात असल्याचे अभाविपचा नेता सौरभ शर्मा याने सांगितले. त्यामुळे आता डाव्या संघटना या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या काही पदांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. त्याचवेळी हे पोस्टर्स विद्यापीठाच्या परिसरात लावण्यात आले होते.