26 व्या वर्षात कोट्यवधीची मालकिन आहे सारा तेंडुलकर, मॉडलिंगबरोबरच करते हे काम

Sara Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरची मोठी फॅन फॉलोईंग आहे. मॉडलिंगबरोबरच साराने स्वत:चा व्यवसायही सुरु केला आहे. अवघ्या 26 व्या वर्षी तीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून कोट्यवधीची मालकिन आहे.   

| Oct 10, 2024, 20:31 PM IST
1/8

26 व्या वर्षात कोट्यवधीची मालकिन आहे सारा तेंडुलकर, मॉडलिंगबरोबरच करते हे काम

2/8

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) अगदी लहान वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा तेंडुलकर आपल्या लाईफ स्टाईलसाठी (Life Style) प्रसिद्ध आहे. 

3/8

साराने आपल्या आईप्रमाणेच वैद्यकिय शिक्षक पूर्ण केलं आहे. आज ग्लॅमर क्षेत्रातही तिने छाप उमटवली आहे. स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर सारा आज कोट्यवधी रुपयांची मालकीन आहे. 

4/8

साराचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 मध्ये झाला. तीने आपल्या शालेय शिक्षण मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तीने बायोमेडिकल सायन्समध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. 

5/8

2011 मध्ये सारा तेंडुलकरने अजिओ ल्यूक्ससाठी मॉडलिंग केलं. इथूनच तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात झाली. तीने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये मॉडलिंग केली आहे.

6/8

 मॉडलिंगबरोबर सारा एक बिझनेस वूमनदेखील आहे. तीने स्वत:चा ऑनलाईन बिझनेस सुरु केला आहे. ती 'सारा प्लॅनर्स' नावाने डायरीची विक्री करते. 

7/8

सारा मॉडलिंगबरोबरच ब्रँड एंडोर्समेंट, सारा प्लॅनर्स आणि इन्स्टाग्राम प्रमोशनच्या माध्यमातून कमाई करते. शिवाय सोशल मीडियावरही ती प्रचंड लोकप्रिय आहे. 

8/8

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे 7,1 मिलिअन फॉलोअर्स आहेत. मीडिया रिपोर्टनुसार साराचं नेटवर्थ 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.