शरीरातील 'या' 7 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, असू शकतो हार्ट अटॅकचा संकेत

ह्रदयविकाराचा झटका येणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांचा हार्ट अटॅकचा मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत.   

| Oct 10, 2024, 20:32 PM IST

ह्रदयविकाराचा झटका येणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांचा हार्ट अटॅकचा मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना सतत समोर येत आहेत. 

 

1/10

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारही वाढले आहेत. हार्ट अटॅक येणं ही तर आता सामान्य बाब झाली आहे. अनेक घटनांमध्ये तर लहान मुलांनाही हार्ट अटॅक आल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रत्येकानेच काळजी घेणं आता गरजेचं झालं आहे.   

2/10

हार्ट अटॅक येण्याआधी छातीत वेदना होतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण प्रत्येकालाच हे लक्षण जाणवेल असं नाही. दरम्यान हार्ट अटॅक येण्याआधी शऱीर काही संकेत देत असतं त्याकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षण कोणती आहेत ते जाणून घेऊयात.   

3/10

जबडा दुखणे

जबडा दुखणे

जर तुमचा जबडा दुखत असेल तर हे येणाऱ्या हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो.   

4/10

भोवळ येणे

भोवळ येणे

जर तुम्हाला चक्कर येत असेल तर हेदेखील हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.   

5/10

खांदा दुखणे

खांदा दुखणे

जर तुमचा खांदा दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कदाचित तो पुढच्या धोक्याचा संकेत असेल.   

6/10

हात दुखणे

हात दुखणे

हात दुखणंही तुम्हाला येणाऱ्या संकटाची चाहूल देत असतं.   

7/10

श्वास घेताना थकवा

श्वास घेताना थकवा

श्वास घेताना थकव जाणवणं हेदेखील हार्ट अटॅकचं लक्षण असतं.   

8/10

छातीत वेदना

छातीत वेदना

हार्ट अटॅकचं सामान्य लक्षण म्हणजे छातीत वेदना होणं. जर तुमच्या छातीत दुखत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.   

9/10

मळमळ आणि उलट्या

मळमळ आणि उलट्या

मळमळ आणि उलट्या होणं हे फक्त आजारी असल्याचं लक्षण नाही. कदाचित येणाऱ्या हार्ट अटॅकआधी तुम्हाला मिळालेला तो संकेत आहे.   

10/10

Disclaimer: जर तुम्हाला यापैकी कोणताही त्रास जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. ही माहिती सामान्य माहितीवर उपलब्ध आहे.