मुंबई : UIDAI ने आधार कार्ड संदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे. जी माहिती सर्वसामान्यांसाठी फारच महत्वाची आहे. UIDAI च्या म्हण्यानुसार खुल्या बाजारातून PVC आधार प्रत वापरण्याचा सल्ला दिला जात नाही. अशा PVC कार्ड्समध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षा वैशिष्ट्ये नसल्यामुळे, PVC आधारची प्रिंटेड प्रत बाजारातून मिळवणे टाळावे. UIDAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला PVC आधार कार्ड हवे असेल तर तुम्ही 50 रुपये भरून आधारच्या सरकारी एजन्सीकडून ऑर्डर करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UIDAI ने ट्विटमध्ये सांगितले आहे की, PVC कार्ड किंवा प्लास्टिक कार्ड किंवा आधार स्मार्ट कार्ड खुल्या बाजारातून बनवले असेल, तर ते वैध मानले जाणार नाही. UIDAI ने असेही सांगितले आहे की, कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड वापरून ग्राहक त्यांचे काम करू शकतात.



ट्विटमध्ये लिहिले आहे, uidai.gov.in वरून डाउनलोड केलेले आधार किंवा आधार पत्र किंवा एम-आधार प्रोफाइल किंवा UIDAI द्वारे जारी केलेले PVC कार्डचाच तुम्ही व्यवहारात वापर करु शकता.


आधार जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने खुल्या बाजारातून छापलेल्या प्लॅस्टिक कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांचा अभाव असल्याचे कारण देत ते बनवणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. 
UIDAI ने सांगितले की, प्लास्टिक कार्ड बनवण्यासाठी ग्राहक UIDAI च्या पोर्टलवर 50 रुपये भरून ऑर्डर ते करू शकतो. हे प्लास्टिक कार्ड काही दिवसात तयार होईल आणि ते घरच्या पत्त्यावर वितरित केले जाईल.