पाटणा : बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड होण्याचे संकेत मिळत आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र येण्याच्या हालचाली दिसत आहेत. हा एनडीएला मोठा झटका असण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. याचे कारण म्हणजे जेडीयूचे प्रशांत किशोर यांनी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आरजेडी आणि नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष विलीन करुन नवीन पक्ष स्थापनासाठी चर्चा केली. निवडणुकीच्याआधी नवीन पक्षाकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले पाहिजे, असे म्हटले आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी दिली आहे. त्यामुळे ही सर्वात मोठी राजकीय घडामोड असण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राबडी देवी यांनी म्हटले आहे की, प्रशांत किशोर लालूप्रसाद यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेले आणि मुलाखत केली याबाबत नकार देत असतील ते पूर्णत: खोटे आहे. आरजेडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राबडी देवी यांनी सांगितले, मी याबाबत नाराज झाली आहे आणि त्याला येथून जायला सांगितले. कारण नितीश कुमार यांनी धोका दिला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. २०१७ मध्ये नितीश कुमार आरजेडी आणि काँग्रसची साथ सोडून भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएत सहभागी झाले होते.


जेडीयूचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आमच्याशी पाच वेळा चर्चा केली. याचे साक्षिदार आमचे सर्व कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक आहेत, असे सध्या विरोधी पक्षनेत्या असलेल्या राबडी देवी यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशी काही चर्चा झालेली नाही, असा दावा आता जेडीयूकडून करण्यात येत आहे.