नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना दिल्लीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण सप्टेंबरमध्येच राजीनामा दिला होता. आज पक्षाध्यक्ष राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर तो स्वीकारण्यात आल्याचा दावा माकन यांनी केला आहे. पक्षाचे दिल्ली प्रभारी पी. सी. चाको यांनीही याला दुजोरा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



मात्र लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या हालचालींमुळे माकन नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला असल्याचंही बोललं जातंय. 'आप'सोबत संभाव्य आघाडीसाठी समर्पक भूमिका घेणाऱ्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकली जाऊ शकते. त्यांच्याखेरीज योगानंद शास्त्री, राजकुमार चौहान, हरून युसूफ आणि चत्तर सिंग यांचीही नावं चर्चेत आहेत.