बंगळूर :  गेल्या काही दिवसात राहुल गांधी भाजपा विरोधात आक्रमक झालेले दिसून येत आहेत. सोशल मीडियावरही राहुल गांधींचा दबदबा पहायला मिळत आहे. त्यामूळे येत्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत ते सुरू असलेल्या हाराकिरीचा बदला घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान त्यांनी भाजपाला मात देण्यासाठी एक सिक्रेट प्लान आखला होता. पण कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तो जगजाहीर केल्याने राहुल चिंतेत पडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी पार्टी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या टीप्स आणि सिक्रेट प्लान सांगितले. भाजपा नेत्यांवर वैयक्तिक टीका करु नका असाही एक सल्ला त्यांनी यावेळी दिला. इथे चर्चा झालेले, ठरलेले विषय आपल्यातच ठेवा, त्याची वाच्यता कुठेही करु नका असेही त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना बजावले. पण कॉंग्रेस नेत्यांना अतिउत्साह पुन्हा एकदा समोर आला आहे.
  
भाजपच्या नेत्यांवर वैयक्तिक मतं टाळावीत आणि त्याऐवजी त्यांनी राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्यांवर घेरा असा सल्ला राहुल गांधी यांनी दिल्याचे कर्नाटक कॉंग्रेसचे नेते जी. परमेश्वर यांनी सांगितले.  १२ ऑक्टोबरला झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्या.  यावेळी मल्लिकार्जुन खडगे, ऑस्कर फर्नांडिस आणि बी के. हरिप्रसाद यांच्यासह अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. 


भाजप नेत्यांवर वैयक्तिक टीका न करता राष्ट्रीय व स्थानिक मुद्यांनी त्यांना घेरा असा सल्ला राहुल यांनी दिल्याचे परमेश्वर यांनी सांगितले. हिमाचल प्रदेश आणि गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस जोरदार तयारीला लागली आहे.